बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील बायकॉन कंपनीने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, एकत्रित निव्वळ नफ्यात डिसेंबर अखेर तिमाहीत दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. २१७.२/- करोड आहे. बियॉलॉजीक्स बिझनेस मध्ये कंपनीने ऊत्तम कामगिरी करीत हे यश मिळवले आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.९१.९/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत एकत्रित महसूल रु.१५४०.८/- करोड आहे.