विक्रीत वाढ झाल्याने PC ज्वेलर्स ला ३० सप्टेंबर १७ अखेर तिमाहीत नफ्यात ४०.८३% ची वाढ झाली आहे. व हि रक्कम रु. १५०.५९/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.१०६.९३/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. एकूण उत्पन्न १८.७८% नि वाढले असून जुलै-सप्टेंबर २०१७ या तिमाहीत रु.२६४२.९८/- करोड चे उत्पन्न मिळाले आहे. जुलै-सप्टेंबर २०१६ करिता हि रक्कम रु.२२२५/- करोड होती. देशांतर्गत विक्रीतून महसुलात ३०.१०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु.१८५०.९६/- करोड आहे. तसेच निर्यातीत ५.४१% ची वाढ होऊन रु.७७१.३६/- करोड ची निर्यात केली आहे. या तिमाहीत खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु.२४२५.१५/- करोड आहे. तसेच हे क्षेत्र अद्याप असंघटित असल्याने नव्या GST कायद्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. याबद्दल बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बाळाराम गर्ग म्हणाले, भविष्यात मार्केट शेअर मध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कंपनी प्रयत्न शील असून आता हे क्षेत्र संघटित होत असून अर्थव्यवस्थेतील नवे बदल या क्षेत्रास फायदेशीर ठरतील. कंपनी गोल्ड ज्वेलरी, डायमंड ज्वेलरी व सिल्वर च्या विविध वस्तू यांचे उत्पादन व विक्री व्यवसायात कार्यरत आहे.