सार्वजनिक क्षेत्रातील SAIL कंपनीने मागील वर्षी त्यांच्या विविध प्लांटच्या आधुनिकीकरण व विस्तारावर रु.६४,५६२/- करोड चा खर्च केला आहे. तसेच रु.२३२४/- करोड चा अतिरिक्त खर्च देखील केला आहे. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ने त्यांच्या भिलाई, बोकारो, रुरकेला, दुर्गपुर, बारांपुर, सालेम येथील प्लांटच्या विस्तार व आधुनिकीकरणाच्या कामास मागील वर्षी सुरवात केली होती. यामुळे क्रूड स्टील ची उत्पादन मर्यादा १२.८ मिलियन टन प्रति वर्ष वरून २१.४ मिलियन टन प्रति वर्ष ने वाढली आहे. त्यापैकी सालेम, रुरकेला, दुर्गपुर येथील विस्ताराचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच भिलाई स्टील प्लँट येथ युनिव्हर्सल रेल मिल बांधकामाचे काम पूर्ण केले आहे. येथे जगातील सर्वाधिक लांबीची रेल्वे व रेल्वे वेल्डिंग लाईन चे काम पूर्ण करण्यात आले. या आधुनिकीकरणानंतर जरी कंपनीच्या उत्पादन क्षमतेत ६०-७० % वाढ होणार असली तरीही देशांतर्गत मागणी कमी असल्याचे कंपनीने सांगितले.